Numbers 5:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून तू हे पाणी पिशील तेव्हा तुला अनेक प्रकारचा त्रास होईल तुला मूल होऊ शकणार नाही; तू गरोदर असशील तर तुझे मूल मरुन जाईल; तुझे लोक तुला बाहेर टाकतील व तुझी निंदा करतील.’ “मग याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरापुढे विशेष शपथ घ्यावयास सांगावे; तिने जर लबाडी केली तर ह्या सर्व वाईट गोष्टी तिच्यावर येतील असे तिने कबूल करावे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
(याजकाने शापजनक शपथ घ्यायला लावावी आणि म्हणावे) ‘परमेश्वर तुझी मांडी सडवील व तुझे पोट फुगवील तेव्हा परमेश्वर तुला लोकांच्या शापाला व तिरस्काराला पात्र करो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यावेळी याजकाने त्या स्त्रीस शपथ देऊन या शापाखाली आणावे—जेव्हा याहवेह तुझ्या उदराचा गर्भपात करेल आणि तुझे पोट फुगेल, तेव्हा याहवेह तुला तुझ्या लोकांमध्ये शापित करो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरापुढे शापाची शपथ घ्यावयास सांगावे; परमेश्वर तुझी मांडी सडवील व तुझे पोट फुगविल तेव्हा परमेश्वर तुला लोकांच्या शापाला व तिरस्काराला पात्र करो.