Numbers 6:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग याजकाने एकाचा पापार्पण म्हणून व दुसऱ्याचा होमार्पण करावा. हे पापार्पण म्हणजे त्याच्या पापाबद्दलचे प्रायश्चित होय; कारण तो प्रेताजवळ गेला होता. त्याचवेळी त्या नाजीराने पुन्हा नव्याने देवाची सेवा करण्यासाठी विशेष नवस म्हणून आपल्या डोक्याचे केस देवाला अर्पण करावेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याजकाने एकाचा पापबली व दुसर्‍याचा होमबली अर्पून त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे, कारण त्या प्रेतामुळे त्याला पाप लागले होते; म्हणून याजकाने त्याच दिवशी त्याचे डोके पवित्र करावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग नाजीरासाठी याजकाने त्यापैकी एक पापार्पण व दुसरा होमार्पणाचे प्रायश्चित म्हणून अर्पण करावा, कारण मृतदेहाच्या समक्षतेत राहून त्यांनी पाप केले. त्याच दिवशी त्यांनी पुन्हा आपले डोके पवित्र करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग याजकाने एक पक्षी पापार्पण व दुसऱ्याचा होमार्पण करावा. हे त्याच्यासाठी प्रायश्चित आहे कारण प्रेताजवळ जाऊन त्याने पाप केले. त्याने त्याच दिवशी आपल्या स्वतःला पुन्हा पवित्र करावे.