Numbers 6:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मग नाजीराने निवास मंडपाच्या दारापाशी जावे; तेथे त्याने परमेश्वरासाठी नवस म्हणून वाठविलेल्या आपल्या केसाचे मुंडण करावे. ते केस त्याने शांत्यापर्णाच्या खाली असलेल्या जाळावर टाकावेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग नाजीराने वाहून घेतल्याचे चिन्ह असलेले आपले डोके दर्शनमंडपाच्या दाराजवळ मुंडावे आणि आपले केस शांत्यर्पणाच्या खाली असलेल्या अग्नीवर टाकावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘मग नाजीराने आपल्या डोक्यावरील केस जे त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे, ते सभामंडपाच्या दारात मुंडवावे. मग ते केस घेऊन त्यांनी शांत्यर्पणाखाली असलेल्या अग्नीत टाकावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग नाजीराने आपण देवासाठी वेगळे झालेल्याचे चिन्ह म्हणून दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी आपल्या डोक्याचे मुंडण करावे. त्याने त्याच्या डोक्यापासूनचे केस घ्यावे आणि शांत्यर्पणाच्या यज्ञाखाली अग्नी आहे त्याच्यावर ठेवावेत.