Numbers 6:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग याजकाने ते ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे. हे सर्व पदार्थ पवित्र आहेत व ते याजकासाठी आहेत. त्याच प्रमाणे मेंढ्याचे ऊर व मांडीही परमेश्वरासमोर ओवाळावी; हे सर्व पदार्थ पवित्र आहेत व ते याजकासाठी आहेत. त्या नंतर नाजीर झालेला होता तो माणूस द्राक्षारस पिण्यास मोकळा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग याजकाने ते ओवाळणी म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे; ओवाळलेला ऊर आणि समर्पिलेली मांडी ह्यांसह हे सर्व याजकासाठी पवित्र समजावे; ह्यानंतर नाजीराला द्राक्षारस पिण्याची मोकळीक आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर याजकाने ते हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहपुढे ओवाळावे; ते पवित्र आहे; त्याचबरोबर ओवाळलेला उराचा भाग आणि सादर केलेला मांडीचा भाग याजकासाठी असावा. यानंतर नाजीर द्राक्षारस पिऊ शकतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग याजकाने ते अर्पणाप्रमाणे परमेश्वरासमोर उंच करून त्यास सादर करावे. जे मेंढ्याचे ऊर व मांडीसह एकत्रित परमेश्वरापुढे उंच केलेले हे याजकासाठी राखून ठेवलेले पवित्र अन्न आहे. त्यानंतर नाजीर मद्य पिऊ शकतो.