Numbers 6:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
स्वत:ला वेगळे केलेल्या त्या काळात नाजीराने आपले केस कापू नयेत. त्याच्या नवसाचा काळ संपेपर्यंत त्याने पवित्र राहावे. त्याने आपले केस लांब वाढू द्यावेत; ते केस त्याने देवाला केलेल्या विशेष नवसाची खूण आहे. स्वत:ला वाहवून घेतलेल्या नवसाचा काळ संपेपर्यंत त्याने आपले केस लांब वाढू द्यावेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जितके दिवस त्याने वाहून घेण्याचा नवस केला असेल, तितके दिवस त्याच्या डोक्याला वस्तरा लावू नये; परमेश्वराला वाहून घेण्याचा त्याचा काळ संपेपर्यंत त्याने पवित्र राहावे आणि आपले केस वाढू द्यावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘नाजीरपणाच्या संपूर्ण काळात त्यांच्या डोक्यावर वस्तरा फिरवू नये. त्यांनी याहवेहला समर्पित केलेला नवसाच्या काळ संपेपर्यंत त्यांनी पवित्र असावे; त्यांनी आपले केस लांब वाढू द्यावेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने परमेश्वरासाठी वेगळे राहण्याचा कालावधी पूर्ण होईपर्यंत त्याच्या नवसाच्या दिवसापर्यंत त्याच्या डोक्यावर वस्तऱ्याचा उपयोग करू नये. तो देवासाठी वेगळा केला आहे. त्याने आपल्या डोक्याचे केस लांब वाढू द्यावेत.