Numbers 7:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मोशेने पवित्र निवास मंडप उभा करण्याचे काम संपविले व त्याच दिवशी परमेश्वराला तो समर्पित केला. त्याने पवित्र निवास मंडप, त्यातील सर्व सामान तसेच वेदी व तिच्या सोबत वापरावयाची उपकरणे ही सर्व तेलाच्या अभिषेकाने पवित्र केली. त्यावरुन त्या वस्तू फकत परमेश्वराच्या उपासनेकरिताच वापरावयाच्या आहेत हे दिसले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मोशेने निवासमंडप उभा करण्याचे संपवले आणि तो मंडप व त्यातील सर्व सामान हे तैलाभ्यंग करून पवित्र केले, आणि वेदी व तिची सर्व उपकरणे हीसुद्धा तैलाभ्यंग करून पवित्र केली;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा मोशेने निवासमंडप उभारण्याचे काम संपविले, तेव्हा त्याने निवासमंडप व त्यातील सामानावर अभिषेक केला व ते पवित्र केले. त्याने वेदी व त्याची सर्व पात्रे सुद्धा अभिषिक्त करून ती पवित्र केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्या दिवशी मोशेने निवासमंडपाचे काम संपविले, त्याने तो अभिषेक करून व परमेश्वराच्या उपयोगासाठी त्यातील सर्व एकत्रित साहित्यासह पवित्र केला. त्याने वेदी व त्यातील सर्व पात्रे अभिषेक करून पवित्र केली. त्याने त्यास अभिषेक केला व त्यास पवित्र केले.