Numbers 7:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याने चार गाड्या व आठ बैल मरारी वंशाच्या लोकांना दिले; त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती. अहरोन याजकाचा मुलगा इथामर हा ह्या सर्व लोकांच्या कामाबद्दल जबाबदार होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मरारीच्या वंशजांना त्यांच्या सेवेप्रमाणे चार गाड्या व आठ बैल दिले; हे अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या हाताखाली होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्याने मरारी कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार चार गाड्या व आठ बैल दिले. ते सर्व अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या नेतृत्वाखाली होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने चार गाड्या व आठ बैल मरारी वंशाना दिले, ते अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या देखरेखीखाली होते. त्याने हे अशासाठी केले की त्यांना त्याची गरज होती.