Numbers 8:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएल लोकांनी लेवी लोक मला द्यावेत. ते माझे होतील. पूर्वी मी प्रत्येक इस्राएलास सांगितले होते की प्रत्येक घरातून प्रथम जन्मलेला मुलगा मला द्यावा. परंतु आता इतर इस्राएलातील प्रथम जन्मलेल्या मुलांच्या ऐवजी मी लेवी लोक घेत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण इस्राएल लोकांमधून ते मला सर्वस्वी वाहिलेले आहेत; उदरातून प्रथम निघणार्या अर्थात इस्राएल लोकांच्या प्रथमजन्मलेल्या सर्वांच्या ऐवजी मी त्यांना आपले करून घेतले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएली लोकांमधून ते सर्वस्वी मला समर्पित आहेत. प्रत्येक इस्राएली स्त्रीच्या प्रथम जन्मलेल्या पुरुषाऐवजी, मी त्यांना आपलेसे करून घेतले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे करा, कारण इस्राएल लोकांमधून ते पूर्णपणे माझे आहेत. इस्राएल वंशातील गर्भाशयातून निघणारे प्रत्येक प्रथम पुरुष मूलाची ते जागा घेतील. मी लेवींना आपल्या स्वतःसाठी घेतले आहे.