Numbers 8:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्राएल लोकातून मी लेवी लोक निवडले आहेत आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना मी ते दान म्हणून देत आहे. दर्शनमंडपात लेवी लोकांनी सर्व इस्राएल लोकाकरिता काम करावे अशी माझी इच्छा आहे. ते इस्राएल लोकांसाठी असलेली प्रायाश्चिताची अर्पणे करतील त्यामुळे इस्राएल लोक शुद्ध होतील. मग इस्राएल लोक पवित्रस्थानाजवळ आले तरी त्यांना भारी आजार किंवा त्रास होणार नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दर्शनमंडपात इस्राएल लोकांसाठी सेवा करायला व इस्राएल लोकांसाठी प्रायश्‍चित्त करायला अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना इस्राएल लोकांतून लेवी दान म्हणून मी दिले आहेत; म्हणजे इस्राएल लोक पवित्रस्थानाजवळ आले असता त्यांच्यावर अनर्थ गुदरू नये.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी लेव्यांना सर्व इस्राएली लोकांमधून अहरोन व त्याच्या पुत्रांना भेट म्हणून दिले आहे, यासाठी की इस्राएली लोकांच्या वतीने त्यांनी सभामंडपात सेवा करावी व त्यांच्यासाठी प्रायश्चित करावे, म्हणजे इस्राएली लोक पवित्रस्थानाकडे जातील, तेव्हा कोणतीही पीडा त्यांचा नाश करणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहरोन व त्याच्या मुलांना मी लेवींना दान म्हणून दिले आहेत. दर्शनमंडपामध्ये सर्व इस्राएल लोकांचे काम करण्यासाठी मी त्यांना घेतले आहे. जेव्हा लोक पवित्रस्थानाजवळ येतील तर त्यांनी मरीने नाश होऊ नये म्हणून इस्राएल लोकांसाठी प्रायाश्चिताची अर्पणे करावी.