Numbers 8:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यानंतलेवी लोक सेवा करण्यास दर्शनमंडपात आले. अहरोन व त्याच्या मुलांनी त्यांच्यावर देखरेख केली; कारण ते लेवी लोक करीत असलेल्या सेवेबद्दल जबाबदार होते. परमेश्वराने मोशेकडून अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी लेवी लोकांचे सर्व काही केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यानंतर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यासमोर लेवी आपापली सेवा करण्यासाठी दर्शनमंडपात गेले. लेव्यां-संबंधाने परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर लेवी लोक अहरोन व त्याच्या पुत्रांच्या देखरेखीखाली सेवा करण्यासाठी सभामंडपात आले. लेव्यांच्या संबंधी याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याचप्रमाणे त्यांनी केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यानंतर, लेवी दर्शनमंडपामध्ये अहरोनापुढे व त्याच्या मुलांपुढे आपली नेमलेली सेवा करण्यास आत गेले. परमेश्वराने मोशेला लेव्याबद्दल आज्ञा केल्याप्रमाणे केले. त्यांनी सर्व लेव्यांना ह्याप्रकारे वागवले.