Numbers 9:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुमच्यामध्ये राहाणाऱ्या एखाद्या विदेशी माणसाला तुमच्याबरोबर वल्हांडण सण पाळण्याची व परमेश्वराला अर्पण देण्याची इच्छा असेल तर त्याला तसे करण्यास परवानगी आहे. परंतु तो त्याने वल्हांडण सणाचे सर्व नियम पाळून साजरा करावा. प्रत्येकसाठी स्वदेशी किंवा परदेशी सणाचे नियम सारखेच आहेत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमच्यामध्ये राहणार्या कोणा परदेशीयाला परमेश्वरा-प्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळायची इच्छा असली तर त्याने ह्या सणाचे विधी व नियम ह्यांना अनुसरून तो पाळावा. स्वदेशीय व परदेशीय ह्या दोघांनाही एकच नियम असावा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘तुमच्यामध्ये राहत असणार्या परदेशी व्यक्तीनेही विधी नियमानुसार याहवेहचा वल्हांडण पाळावा. परदेशी व स्वदेशी व्यक्तीसाठी सारखाच नियम असावा.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर तुमच्यामध्ये एखाद्या परराष्ट्रीय मनुष्य राहतो आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ वल्हांडण सण पाळतो, तो त्याने पाळावा आणि त्याने दिलेल्या आज्ञा व वल्हांडणाचे सर्व नियम व विधीप्रमाणे पाळून साजरा करावा. परक्यांना आणि तुम्ही देशात जन्मलेल्या सर्वांना सणाचे नियम सारखेच आहेत.