Numbers 9:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ढग जर पवित्र निवास मंडपावर दोन दिवस, किंवा महिनाभर किंवा वर्षभर राहिला तर लोक परमेश्वराची आज्ञा मानून तेथेच राहात असत आणि ढग हाले पर्यंत तेथून हालत नसत, मग ढग जेव्हा आपल्या जागेवरुन हाले तेव्हा लोकही तळ हलवीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मेघ निवासमंडपावर छाया करून दोन दिवस, एक महिना किंवा त्याहून अधिक काळ जरी राहिला तरी ते तळ देऊन राहत आणि कूच करीत नसत; तो वर गेला म्हणजे ते कूच करीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
निवासमंडपावर मेघ दोन दिवस थांबून राहो किंवा एक महिना किंवा एक वर्ष राहो, इस्राएली लोक आपल्या छावणीत राहत आणि पुढे जात नसत; परंतु जेव्हा मेघ वर घेतला जाई, ते पुढे जात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर ढग निवासमंडपावर दोन दिवस, महिनाभर किंवा वर्षभर राहिला तरी इस्राएल लोक तळ देऊन राहत असत आणि प्रवास करीत नव्हते. पण मग ढग वर गेला म्हणजे ते प्रवासास निघत.