Obadiah 1:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू इस्राएलच्या शत्रूंना जाऊन मिळालास; परक्यांनी इस्राएलचे धन लुटून नेले परदेशी इस्राएलच्या गावाच्या वेशीतून आत शिरले; त्यांनी यरुशलेमचा कोणता भाग घ्यायचा ह्यासाठी चिठ्या टाकल्या; आणि तू अगदी तेथेच तुझ्या वाटणीची वाट बघत उभा होतास.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या दिवशी तू अलग राहिलास, ज्या दिवशी परके त्याची मालमत्ता घेऊन गेले, परदेशीयांनी त्याच्या वेशीत शिरून यरुशलेमेविषयी चिठ्ठ्या टाकल्या, त्या दिवशी तूही त्यांतला एक होतास.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अनोळखी लोकांनी जेव्हा त्याची संपत्ती पळवून नेली त्या दिवशी तू अलिप्त राहिला आणि परदेशी लोक त्याच्या वेशीत शिरले आणि यरुशलेमसाठी चिठ्ठ्या टाकल्या, तेव्हा तू त्यांच्यापैकी एक होतास.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्या दिवशी तू अलिप्त राहिलास, ज्या दिवशी परक्यांनी त्यांची संपत्ती लुटून नेली, परदेशी त्यांच्या वेशीत शिरून; आणि त्यांनी यरूशलेमेविषयी चिठ्ठ्या टाकल्या; आणि त्या दिवशी तूही त्यातला एक होतास.