Obadiah 1:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुझे मित्र असलेले लोकच तुला देशातून बळजबरीने बाहेर काढतील. तुझे मित्र तुला फसवतील व चुकीच्या गोष्टी करण्यासाठी तुझी खात्री करतील. युध्दात तुझ्याबरोबर असलेले सोबती तुझ्यासाठी सापळा रचायचा बेत करीत आहेत. ते म्हणतात, ‘ते तुझ्या लक्षात येणार नाही’.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्याबरोबर करारमदार केलेल्यांनी तुला सीमेवर लावून दिले आहे; तुझ्याबरोबर सल्ला केलेल्यांनी तुला फसवले आहे, ते तुझ्यावर प्रबल झाले आहेत. तुझे अन्न खाणार्‍यांनी तुझ्यासाठी जाळे पसरले आहे; अदोमात समज मुळीच नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझ्यासोबत करार केलेले सर्व मित्र राष्ट्रे तुला तुझ्या सीमेपर्यंत ढकलतील; तुझे मित्र तुला फसवतील आणि तुझा ताबा घेतील; जे तुझी भाकरी खातात, तेच तुझ्यासाठी सापळा रचतील, परंतु तुला ते कळणारही नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या कराराच्या सर्व मनुष्यांनी तुला तुझ्या सीमेपर्यंत घालवले आहे, तुझ्याबरोबर सल्ला केलेल्या मनुष्यांनी तुला फसवले आहे, आणि ते तुझ्यावर प्रबल झाले आहेत. तुझी भाकर खाणाऱ्यांनी तुझ्यासाठी जाळे पसरले आहे. त्याच्यात काही समजूतदारपणा नाही.