Philemon 1:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु तुझ्या संमतीशिवाय मला काहीही करायचे नव्हते. यासाठी की तुझे कोणतेही चांगले कार्य दडपणामुळे होऊ नये तर तुझ्या खुशीने व्हावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पण तू मला साहाय्य करावे, हे मला तुझ्यावर लादायचे नाही, तर तू हे स्वेच्छेने करावे, अशी माझी इच्छा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही; ह्यासाठी की, तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु तुझ्या संमतीशिवाय काहीही करणे मला योग्य वाटले नाही, यासाठी की जे काही औदार्य तू करशील ते बळजबरीने केल्यासारखे नसावे परंतु स्वेच्छेने केलेले असावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण, तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही, ह्यासाठी की, तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा.