Philemon 1:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी, पौल, हे माझ्या स्वत:च्या हातांनी लिहीत आहे: मी याची तुला परतफेड करीन. (मी तुला हे सांगण्याची गरज नाही की, तुझे स्वत:चे जीवन तू मला देणे लागतोस.)
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे मी, पौलाने स्वतः लिहिले आहे. मी तुझी परतफेड करीन. माझे तुझ्यावर किती उपकार आहेत, ह्याविषयी मी काही बोलत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हा माझा पौलाचा स्वदस्तुरचा लेख आहे; ते मी फेडीन; शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण हे मी तुला म्हणत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे, मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी लिहित आहे. मी त्याची परतफेड करेन—वास्तविक तू स्वतः माझा ॠणी आहेस, परंतु मी त्याचा उल्लेख करणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी पौल हे स्वहस्ते लिहित आहे; मी स्वतः त्याची फेड करीन. शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण याचा उल्लेख मी करीत नाही.