Philemon 1:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुझ्या आज्ञाधारकपणाविषयी मला खात्री आहे म्हणून मी तुला लिहीत आहे. मला माहीत आहे की, मी सांगत असलेल्या गोष्टीपेक्षा तू अधिक करशील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे आणि मला ठाऊक आहे की, मी जे सांगतो, त्यापेक्षा तू अधिकही करशील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे, आणि मला ठाऊक आहे की, मी जे म्हणतो, त्यापेक्षा तू अधिकही करशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू आज्ञापालन करशील याची खात्री बाळगून मी तुला हे लिहिले आहे आणि जे मी तुला सांगत आहे त्यापेक्षा तू कितीतरी अधिक करशील हे मला माहीत आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे; आणि मी जाणतो की, तू माझ्या म्हणण्यापेक्षा अधिकही करशील.