Philippians 4:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कशाचीही काळजी करु नका, तर प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंत्या उपकार मानून तुमच्या विनंत्या देवाला कळवा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कशाविषयीही काळजी करू नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार मानत आपली गरज देवाला कळवा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व परिस्थितीत, प्रार्थना व विनवणी करीत, उपकारस्तुतीसह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा;