Proverbs 11:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुष्टांना खरोखरच शासन होईल. ही गोष्ट खरी आहे. आणि चांगल्या लोकांना सोडून देण्यात येईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुर्जनाला शिक्षा चुकणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो, पण नीतिमानांच्या वंशजांची मुक्तता होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याची खात्री असू दे: दुष्टाला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, परंतु जे नीतिमान आहेत त्यांची सुटका होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुष्टांना शासन झाल्यावाचून राहणार नाही याची खात्री बाळगा, परंतु नीतिमानांच्या वंशजांना सुरक्षित ठेवले जाईल.