Proverbs 11:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जो अधाशी माणूस त्याचे धान्य विकायला नकार देतो त्याच्यावर लोक रागावतात. पण जो माणूस दुसऱ्यांना खायला मिळावे म्हणून आपले धान्य विकतो त्याच्याबद्दल लोकांना आनंद वाटतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो धान्य अडकवून ठेवतो त्याला लोक शाप देतात; जो ते विकतो त्याच्या मस्तकी आशीर्वाद येईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो धान्य अडवून ठेवतो, त्याला लोक शाप देतात, परंतु जो विकण्यास इच्छुक असतो, त्याच्यासाठी लोक आशीर्वादाची प्रार्थना करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो मनुष्य त्याचे धान्य विकायला नकार देतो त्यास लोक शाप देतात, पण जो ते विकतो त्याच्या मस्तकी चांगल्या दानाचा मुकुट प्राप्त होईल.