Proverbs 12:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर एखादा माणूस खरे बोलत असेल तर तो ज्या गोष्टी सांगतो त्यातही तो प्रामाणिक असतो. पण जर एखादा खोटं बोलत असेल तर त्याचे बोलणे संकटाकडे नेते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्याच्या तोंडून सत्याचे उद्गार श्वासाप्रमाणे बाहेर पडतात, तो न्याय्यत्व प्रकट करतो. परंतु असत्य साक्षी कपट उच्चारतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रामाणिक साक्षीदार सत्य बोलतो, परंतु खोटा साक्षीदार लबाड बोलतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो कोणी खरे बोलतो तो जे काय योग्य आहे ते सांगतो, पण खोटा साक्षीदार लबाड सांगतो.