Proverbs 19:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
काही गोष्टींविषयी खूप उत्साह दाखविणे एवढेच पुरेसे नसते. तुम्ही काय करीत आहात ते तुम्हाला कळले पाहिजे. एखादी गोष्ट करण्यासाठी एकदम् पुढे घुसू नये, नाही तर तुम्ही ती चुकीची कराल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आत्मा ज्ञानहीन असणे बरे नाही; उतावळ्या पायाचा मनुष्य वाट चुकतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योग्य ज्ञान असल्याशिवाय इच्छा धरणे चांगले नाही— घाई करणारे पाय कितीदा असे मार्ग चुकवितात!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्ञानाशिवाय इच्छा असणे सुद्धा चांगले नाही, आणि जो कोणी उतावळ्या पायांचा आहे तो वाट चुकतो.