Proverbs 21:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शहाण्या माणसाला जवळ जवळ सगळ्या गोष्टी येतात. बलदंड माणसे ज्याचा बचाव करीत आहेत अशा शहरावर तो हल्ला करु शकतो आणि जी भिंत त्यांचे रक्षण करील असा त्यांना विश्वास वाटतो, तिचाही तो नाश करु शकतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सुज्ञ मनुष्य बलाढ्यांच्या नगराच्या तटावर चढून त्यांचा आश्रयदुर्ग पाडून टाकतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सुज्ञ मनुष्य बलवानाच्या शहराविरुद्ध जाऊ शकतो आणि ज्या किल्ल्यावर ते भरवसा ठेवतात ते तो उद्ध्वस्त करतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सुज्ञ मनुष्य बलवानांच्या नगराविरूद्ध चढतो, आणि तो त्यांच्या संरक्षणाचा आश्रयदुर्ग पाडून टाकतो.