Proverbs 22:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर एखादा माणूस त्याच्या कामात तरबेज असला तर तो राजांची चाकरी करण्यायोग्य असतो. त्याला बिनमहत्वाच्या लोकांसाठी काम करावे लागणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजांसमोर आहे; हलकट लोकांसमोर नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्या कामात निपुण असणारी माणसे तू पाहिली आहे का? ते खालच्या श्रेणीच्या अधिकार्यांसमोर नाही तर राजांसमोर सेवा करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो आपल्या कामात तरबेज अशा मनुष्यास तू पाहिले आहे का? तो राजासमोर उभा राहील; तो सामान्य लोकांसमोर उभा राहणार नाही.