Proverbs 25:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दु:खी माणसासमोर आनंदी गीत गाणे हे त्याला थंडी वाजत असताना त्याच्या अंगावरील कपडे काढून टाकण्यासारखे आहे. ते सोड्यात शिरका मिसळण्यासारखे आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
थंडीच्या दिवसांत अंगावरील पांघरूण काढणे, सोर्‍यावर शिरका घालण्यासारखे आणि खिन्न हृदयापुढे गायन करण्यासारखे आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्याचे अंतःकरण दुःखाने भरले आहे, त्याच्यासाठी हर्षगीत गाणे, एखाद्याचे पांघरूण थंडीच्या दिवसात काढून घेणे, किंवा जखमेवर शिरका ओतणार्‍यासारखे आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो कोणी दु:खी हृदयापुढे गीत गातो, तो थंड हवामानात अंगावरील कपडे काढून टाकण्यासारखा, आणि सोड्यावर टाकलेल्या शिरक्यासारखा आहे.