Proverbs 27:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जो माणूस अंजिराच्या झाडाची निगा राखतो तो त्याची फळे खाऊ शकतो. तसेच जो माणूस त्याच्या धन्याची काळजी घेतो त्याला बक्षीस मिळते. त्याचा मालक त्याची काळजी घेईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो अंजिराचे झाड राखतो तो त्याचे फळ चाखतो; जो आपल्या धन्याच्या सेवेला जपतो त्याचा मान होतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो अंजिराच्या झाडाची राखण करतो, तो त्या झाडाचे फळ खाईल. आणि जे त्यांच्या मालकाचे संरक्षण करतात त्यांचा सन्मान होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो कोणी अंजिराच्या झाडाची निगा राखतो तो त्याचे फळ खाईल. आणि तसेच जो कोणी आपल्या धन्याचे रक्षण करतो त्याचा मान होईल.