Proverbs 30:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
असे काही लोक असतात ज्यांचे दात तलवारीसारखे असतात त्यांचे जबडे सुरी सारखे असतात. ते गरीबांकडून सर्व काही हिसकावण्यात त्यांचा वेळ खर्ची घालतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पृथ्वीवरून गरीब व मनुष्यांपैकी कंगाल ह्यांना खाऊन नाहीतसे करावे, असे तलवारींसारखे ज्यांचे दात व सुर्‍यांसारख्या ज्यांच्या दाढा, असा एक वर्ग आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पृथ्वीवरील गरिबांना आणि मानवजातीतील गरजूंना गिळंकृत करण्यासाठी, त्यांचे दात करवतीसारखे आहेत, आणि ज्यांच्या जबड्यामध्ये चाकू ठेवलेले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गरीबांना पृथ्वीतून व गरजवंताना मनुष्यामधून खाऊन टाकायला, जिचे दात तलवारीसारखे व जिच्या दाढा सुऱ्यांसारख्या आहेत अशी एक पिढी आहे.