Proverbs 30:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर एखादा माणूस दूध घुसळत असेल तर तो लोणी काढतो. जर एखाद्याने कुणाला नाकावर ठोसा मारला, तर त्यातून रक्त येईल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही लोकांना राग येण्यासारखे काही केले तर तुम्ही संकटे निर्माण कराल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दूध घुसळल्याने लोणी निघते नाक पिळल्याने रक्त निघते, तसा राग चेतवल्याने तंटा उपस्थित होतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण जसे साय घुसळल्याने लोणी मिळते, व नाक पिळण्याने रक्त निघते, तसेच क्रोध भडकविल्याने कलह उत्पन्न होतात.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जसे दूध घुसळण्याने लोणी निघते, आणि नाक पिळण्याने रक्त निघते, तसे राग चेतवल्याने भांडणे निर्माण होतात.