Proverbs 6:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू त्या माणसाच्या शक्तीखाली आलास. मग त्याच्याकडे जा आणि स्वत:ला सोडव. त्याच्या कर्जापासून तुझी सुटका करण्यासाठी त्याची भीक माग.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यासाठी माझ्या मुला, तू असे कर की आपल्याला मुक्त करून घे, कारण तू आपल्या शेजार्याच्या हाती सापडला आहेस; तर जा, त्वरा कर; आपल्या शेजार्याला अत्याग्रहाने गळ घाल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून माझ्या मुला, स्वतःला सोडवून घेण्यासाठी तू असे कर, कारण तू तुझ्या शेजार्याच्या हाती सापडला आहेस: तर आता स्वतःला विनम्र करून त्याच्याकडे जा, आणि तुझ्या शेजार्याची झोप उडवून टाक!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ह्याकरिता, माझ्या मुला, तू हे कर आणि आपला बचाव कर, कारण तू शेजाऱ्याच्या तावडीत सापडला आहेस. जा आणि आपल्याला नम्र कर आणि आपल्या शेजाऱ्याला तुला मुक्त करण्यास आग्रह कर.