Psalms 10:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, ते लोक अतिशय दुष्ट आणि वाईट गोष्टी करतात ते तू बघतोस तू त्याकडे लक्ष दे आणि काहीतरी कर. संकटांनी पिडलेले लोक तुझ्याकडे मदतीसाठी येतात. परमेश्वरा, निराधारला मदत करणारा तूच एक आहेस. म्हणून त्यांना मदत कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू हे पाहिलेच आहे, उपद्रव व दुःख ह्यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी त्यांच्याकडे तू नजर लावतोस; लाचार तुझ्यावर हवाला टाकतो; पोरक्यांचा साहाय्यकर्ता तू आहेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु परमेश्वरा, तुम्ही पीडितांच्या यातना पाहता; तुम्ही त्यांची संकटे लक्षात घेऊन आपल्या नियंत्रणात घ्या. ते पीडित स्वतःला तुमच्या स्वाधीन करीत आहेत; कारण तुम्ही पितृहीनांचे साहाय्यकर्ता आहात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू ते पाहिले आहे, कारण तू आपल्या हाती ते घ्यावे म्हणून तू उपद्रव आणि दु:ख पाहतो, लाचार तुला आपणास सोपवून देतो, तू अनाथांचा वाचवणारा आहे.