Psalms 101:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर एखादा माणूस त्याच्या शेजाऱ्याबद्दल गुप्तपणेवाईट गोष्टी बोलत असेल तर मी त्या माणसाला थांबवेन. मी लोकांना गर्विष्ठ होऊ देणार नाही आणि ते इतरांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटू देणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या शेजार्‍याची गुप्तपणे चहाडी करणार्‍याचा मी विध्वंस करीन; जो कुर्रेबाज व गर्विष्ठ मनाचा आहे त्याची मी गय करणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्या शेजार्‍यांची गुप्तपणे निंदानालस्ती करणार्‍यास, मी नष्ट करेन; दुसर्‍यांकडे तुच्छतेने पाहणार्‍याचा व अहंकारी हृदयाच्या मनुष्याचा सहवास मला असह्य वाटेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे निंदानालस्ती करणाऱ्याचा मी नाश करीन. जो कोणी गर्विष्ठ चालीरीतीचा आणि उर्मट वागणूकीचा आहे त्याचे मी सहन करणार नाही.