Psalms 101:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ज्यांच्यावर विश्वास टाकता येईल अशा माणसांना मी देशभर शोधेन आणि केवळ त्याच लोकांना मी माझी सेवा करु देईन. जे लोक शुध्द आयुष्य जगतात तेच माझे सेवक होऊ शकतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देशातील विश्वासू जन माझ्याजवळ राहावेत म्हणून माझी त्यांच्यावर नजर असते. सात्त्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
देशातील निष्ठावान लोकांवर मी माझी दृष्टी लावेन, जेणेकरून ते माझ्या सहवासात राहतील; ज्यांचे आचरण दोषरहित असेल, असेच लोक माझी सेवा करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देशातले विश्वासू यांनी माझ्याजवळ बसावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील; जो सचोटीच्या मार्गाने चालतो तोच माझा सेवक होईल.