Psalms 118:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शत्रूंनी मला मधमाशांच्या थव्याप्रमाणे घेरले होते. परंतु त्यांचा पटकन् जळून जाणाऱ्या झुडपाप्रमाणे लवकरच नाश झाला. मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी मला मधमाश्यांप्रमाणे घेरले आहे; काट्याकुट्यांच्या आगीप्रमाणे ते विझून जातील, परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मधमाश्यांप्रमाणे ते माझ्याभोवती घोंगावत होते, पण जळत्या काटेरी झुडूपांसारखे ते लगेच जळून खाक झाले; याहवेहच्या नावाने मी त्यांचा नाश केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी मला मधमाश्याप्रमाणे घेरले आहे; जशी काट्यांमध्ये जेवढ्या लवकर आग लागते तेवढ्याच लवकर ते नाहीसे होतील. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन.