Psalms 126:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आपण हसत आनंदाचे गाणे गात असू. इतर देशांतील लोक म्हणतील, “इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा आमचे मुख हास्याने व आमची जीभ जयघोषाने भरली, त्या समयी अन्य राष्ट्रांतील लोक म्हणू लागले की, “परमेश्वराने ह्यांच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आमचे मुख हास्याने भरले होते आणि किती हर्षगीते आम्ही गाईली! तेव्हा विधर्मी राष्ट्रे म्हणाली: “पाहा याहवेहने त्यांच्यासाठी किती थोर कृत्ये केली आहेत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग आमचे मुख हास्याने, आणि आमची जीभ गायनाने भरली. नंतर ते राष्ट्रांमध्ये म्हणू लागले; परमेश्वराने ह्यांच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत.