Psalms 127:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
भाकरी मिळव्यासाठी लवकर उठणे आणि रात्री उशीरापर्यंत जागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. देव ज्या लोकांवर प्रेम करतो त्यांची तो ते झोपेत असताना देखील काळजी घेतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता, व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे; तोच आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमचे पहाटे उठणे आणि रात्री उशीरापर्यंत अन्नप्राप्तीसाठी कष्ट करणे व्यर्थ आहे— कारण आपल्या प्रियजनांस याहवेहच शांत झोप देतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही पहाटे लवकर उठता, रात्री उशीराने घरी येता, किंवा कठोर परिश्रम करून भाकर खाता हे सर्व व्यर्थ आहे कारण परमेश्वर आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो.