Psalms 129:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांच्या जवळून जाणारे लोक, “परमेश्वर तुला आशीर्वाद देवो” असे म्हणणार नाहीत. लोक त्यांचे स्वागत करुन, “आम्ही परमेश्वराच्या नावाने तुम्हाला आशीर्वाद देतो” असे म्हणणार नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जवळून येणारेजाणारे त्यांना एवढेसुद्धा म्हणत नाहीत की, “परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हांला प्राप्त होवो, परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हांला आशीर्वाद देतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येणारे जाणारे लोक त्यांना असे न म्हणोत, “याहवेहचे आशीर्वाद तुम्हावर येवोत; आम्ही तुम्हाला याहवेहच्या नावाने आशीर्वाद देतो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्या जवळून येणारे जाणारे म्हणत नाहीत की, “परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो; परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो.”