Psalms 131:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, मी गर्विष्ठ नाही. मी कुणीतरी मोठा आहे असे मी वागत नाही. मी खूप भव्य असे काही करायचा प्रयत्न करत नाही. मी माझ्या आवाक्या बाहेरच्या गोष्टींची चिंता कधीच करत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाचे आरोहणस्तोत्र. हे परमेश्वरा, माझे मन गर्विष्ठ नाही, माझी दृष्टी उन्मत्त नाही आणि मोठमोठ्या व मला असाध्य अशा गोष्टींत मी पडत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे याहवेह, माझे हृदय गर्विष्ठ नाही, माझी नजर उन्मत्त नाही; मला समजत नाही अशा महान आणि अद्भुत गोष्टींपासून मी स्वतःला दूर ठेवतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे परमेश्वरा, माझे हृदय गर्विष्ठ नाही किंवा माझे डोळे उन्मत्त नाही. मी आपल्यासाठी मोठमोठ्या आशा ठेवत नाही, किंवा ज्या माझ्या समजण्या पलीकडे आहेत अशा गोष्टीत मी पडत नाही.