Psalms 132:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर म्हणाला, “दावीद, जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला आणि मी त्यांना शिकवलेले नियम पाळले तर तुझ्या कुटुंबातील कुणीतरी नेहमी राजा होईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझी मुले माझा करार व मी त्यांना शिकवलेले निर्बंध पाळतील, तर त्यांचीही मुले सर्वकाळ तुझ्या राजासनावर बसतील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तुझे वंशज मी केलेल्या करारातील अटींचे व मी शिकविलेल्या आज्ञांचे पालन करतील, तर त्यांचे वंशजही सदासर्वकाळ तुझ्या राजासनावर विराजमान होतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला, आणि मी त्यांना शिकवलेले नियम पाळले, तर त्यांची मुलेसुद्धा तुझ्या राजासनावर सर्वकाळ बसतील.