Psalms 138:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, मी तुझ्या पवित्र मंदिरासमोर नतमस्तक होतो. मी तुझ्या नावाची, तुझ्या खऱ्या प्रेमाची आणि तुझ्या इमानदारीची स्तुती करतो. तू तुझ्या शब्द सामर्थ्याबद्दल प्रसिध्द आहेस. आता तर तू ते अधिकच वाढवले आहेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन, तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकारस्मरण करीन; कारण तू आपल्या संपूर्ण नावांहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उपासना करीत असताना, तुमच्या मंदिराकडे मी नतमस्तक होईन, आणि तुमच्या सर्व दयामय प्रीतीबद्दल आणि विश्वासूपणाबद्दल, तुमची उपकारस्तुती करेन, कारण तुम्ही तुमच्या वचनाला तुमच्या किर्तीपेक्षा उंच केले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुझ्या पवित्र मंदिराकडे नतमस्तक होऊन, तुझ्या कराराची विश्वासयोग्यता आणि तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकारस्तुती करीन. तू आपल्या संपूर्ण नावापेक्षा आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहेस.