Psalms 14:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सियोनमध्ये इस्राएलला कुणी वाचवले? परमेश्वरच इस्राएलला वाचवतो. परमेश्वराच्या माणसांना दूर नेण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने कैदी बनवले गेले. परंतु परमेश्वर त्याच्या माणसांना परत आणील नतंर याकोब (इस्राएल) खूप आंनदी होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देव करो आणि सीयोनेतून इस्राएलाचा उद्धार होवो. परमेश्वर आपल्या लोकांचे दास्य उलटवील, तेव्हा याकोब उल्लासेल, इस्राएल हर्ष पावेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहाहा! सीयोनातून इस्राएलची सुटका होईल! जेव्हा याहवेह त्यांच्या प्रजेची पुनर्स्थापना करतील, तेव्हा याकोब हर्ष करो आणि इस्राएल आनंद करो!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहा! सियोनातून इस्राएलाचे तारण आले तर किती बरे होईल! जेव्हा परमेश्वर त्याच्या लोकांस दास्यातून सोडवेल, तेव्हा याकोब आनंदी होईल आणि इस्राएल हर्ष करेल.