Psalms 16:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु जे लोक उपासनेसाठी दुसऱ्या देवाकडे वळतात त्यांना दु:ख भोगावे लागते. ते त्या मूर्तीना रक्ताची भेट देतात. मी त्यात सहभागी होणार नाही. मी त्या मूर्तींची नावेसुध्दा घेणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे परमेश्वराला सोडून अन्य दैवताच्या भजनी लागतात त्यांना पुष्कळ दु:खे होतील; ते रक्तमय पेयार्पणे अर्पण करतात तशी मी अर्पण करणार नाही. मी त्यांच्या दैवतांची नांवे उच्चारणारही नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे अन्य दैवतांच्या भजनी लागतात, ते अनेक दुःखांनी ग्रासले जातील. अशा दैवतांना मी रक्तमय पेयार्पणे अर्पिणार नाही किंवा त्यांची नावेही मी माझ्या ओठांनी उच्चारणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे दुसऱ्या देवाला शोधतात, त्यांची दु:खे वाढवली जातील. त्यांच्या देवाला मी रक्ताची पेयार्पणे ओतणार नाही. किंवा त्यांचे नावसुद्धा आपल्या ओठाने घेणार नाही.