Psalms 19:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराची शिकवण अतिशय शुध्द अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे. ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या, शुध्द मधापेक्षाही गोड आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या राशींपेक्षा इष्ट आहेत, ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणार्या मधापेक्षा गोड आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सोन्यापेक्षा ते अधिक मौल्यवान आहेत, अतिशुद्ध सोन्यापेक्षाही; ते मधापेक्षा मधुर आहेत, पोळ्यातील मधाहूनही ते अधिक गोड आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते सोन्यापेक्षा ही मौल्यवान आहेत. अती उत्तम सोन्यापेक्षाही ते शुद्ध आहेत. ते मधाच्या पोळ्यातून गळणाऱ्या, मधापेक्षाही गोड आहेत.