Psalms 20:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर त्याने निवडलेल्या राजाला मदत करतो हे आता मला कळले. देव त्याच्या पवित्र स्वर्गात होता आणि त्याने स्वत च निवडलेल्या राजाला उत्तर दिले. देवाने आपल्या महान सामर्थ्याचा राजाला वाचवण्यासाठी उपयोग केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मला आता कळून आले; तो आपल्या उजव्या हाताच्या उद्धारक प्रतापाची कृत्ये करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे ऐकेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता मला माहीत आहे: याहवेह आपल्या अभिषिक्तास विजय प्रदान करतात; पवित्र स्वर्गातून त्यांच्या तारणदात्या उजव्या हाताच्या सामर्थ्याने त्याला उत्तर देतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मी जाणले आहे. त्याच्या तारण करणाऱ्या उजव्या हाताच्या सामर्थ्याने, तो त्याच्या पवित्र स्वर्गातून त्यास उत्तर देईल.