Psalms 24:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तिथे कोण उपासना करु शकतो? ज्या लोकांनी वाईट कृत्ये केली नाहीत, ज्यांचे ह्दय शुध्द आहे, ज्यांनी माझ्या नावाचा उपयोग असत्य सत्य वाटावे यासाठी केला नाही आणि जे खोटे बोलले नाहीत व ज्यांनी खोटी आश्वासने दिली नाहीत असेच लोक तिथे आराधना करु शकतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही, व कपटाने शपथ वाहत नाही तो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्याचे हात निर्मळ आणि ज्याचे हृदय शुद्ध आहे, जो मूर्तींवर भरवसा ठेवत नाही, जो खोटी शपथ वाहत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही, आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही.