Psalms 28:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, मी वाईट कृत्ये करणाऱ्या दुष्ट लोकांसारखा आहे असे मला वाटत नाही. ते लोक त्यांच्या शेजाऱ्यांना “शांती या शब्दाने अभिवादन करतात. परंतु मनात मात्र ते शेजाऱ्यांचे वाईटच चिंतीत असतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मनात कपट असून आपल्या शेजार्‍यांशी स्नेहभावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी ह्यांच्याबरोबर मला ओढून नेऊ नकोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुष्टांना दिलेल्या शिक्षेमध्ये मला ओढू नका, जे अन्याय करतात, शेजार्‍यांशी त्यांचे संभाषण अतिशय सलोख्याचे आहे, परंतु त्यांच्या हृदयात केवळ कपट असते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे अन्याय करतात त्या दुष्टांबरोबर मला फरफटू नकोस. जे त्यांच्या शेजाऱ्यांसोबत शांतीने बोलतात, परंतु त्यांच्या हृदयात मात्र वाईट असते.