Psalms 30:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, तू मला माझ्या संकटांतून वर उचललेस. तू माझ्या शत्रूंना माझा पराभव करु दिला नाहीस आणि त्यांना मला उद्देशून हसण्याची संधी दिली नाहीस म्हणून मी तुला मान देईन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गृहप्रवेशाच्या वेळी गायचे दाविदाचे संगीतस्तोत्र. हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू माझा उद्धार केला आहेस; तू माझ्या वैर्यांना माझ्यामुळे हर्ष करू दिला नाहीस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह मी तुमची प्रशंसा करेन, कारण तुम्ही मला खोल दरीतून बाहेर काढले आहे आणि माझ्या शत्रूंना माझा उपहास करू दिला नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे परमेश्वरा, मी तुला उंच करीन, कारण तू मला उठून उभे केले आहेस आणि माझ्या शत्रूंना माझ्यावर हर्ष करू दिला नाहीस.