Psalms 31:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, तू तूझ्या भक्तांसाठी खूप अद्भुत गोष्टी लपवून ठेवल्या आहेस. तुझ्यावर जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी तू सर्वांसमोर चांगल्या गोष्टी करतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणार्यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा आश्रय करणार्यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमचा चांगुलपणा किती विपुल आहे, जो तुम्ही तुमच्या भय धरणार्यांसाठी राखून ठेवला आहे, आणि जे लोक तुमच्या ठायी आश्रय घेतात त्यांच्यावर त्याचा सर्वांसमक्ष वर्षाव करता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे तुझा आदर बाळगतात त्यांच्यासाठी तू आपला थोर चांगूलपणा जपून ठेवला आहे, जे तुझ्यामध्ये आश्रय घेतात त्यांच्याकरिता तू सर्व मानवजाती समोर घडवून आणतोस.