Psalms 31:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाच्या भक्तांनो, तुम्ही परमेश्वरावर प्रेम करा. परमेश्वर त्याच्यावर विश्वास टाकणाऱ्या लोकांचे रक्षण करतो. परंतु जे लोक स्वतच्या सामर्थ्याचा गर्व करतात त्यांना तो शिक्षा करतो. परमेश्वर त्यांना योग्य अशीच शिक्षा देतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहो परमेश्वराचे सर्व भक्तहो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा; परमेश्वर विश्वास ठेवणार्यांचे रक्षण करतो; गर्विष्ठांचे पुरेपूर पारिपत्य करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहो याहवेहच्या सर्व भक्तांनो, त्यांच्यावर प्रीती करा! याहवेह प्रामाणिक लोकांना मदत करतात पण ते गर्विष्ठांना पूर्ण मापाने शिक्षा करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहो सर्व परमेश्वराच्या मागे चालणाऱ्यांनो, त्याच्यावर प्रीती करा. कारण परमेश्वर विश्वासू लोकांचे रक्षण करतो. परंतु तो गर्विष्ठ्यांची परत फेड करतो.