Psalms 35:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु मी जेव्हा चूक केली तेव्हा ते लोक मला हसले ते लोक सच्चे मित्र नव्हते. मी त्यांना नीट ओळखत देखील नव्हतो परंतु ते माझ्या भोवती गोळा झाले आणि ते त्यांनी माझ्यावर हल्ला केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी लंगडलो तेव्हा त्यांना आनंद झाला; ते एकत्र जमले, ते अधम मला नकळत माझ्याविरुद्ध एकत्र जमले; त्यांनी माझी निंदा एकसारखी चालवली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण आता मी संकटात सापडलो असताना त्यांना आनंद होत आहे. माझ्यावर आक्रमण करणारे मला माहीत नसताना एकत्र येऊन, माझी एकसारखी निंदा करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु मी अडखळलो असता, त्यांनी एकत्र येऊन हर्ष केला. मला माहित नसता ते माझ्याविरूद्ध एकत्र जमले.