Psalms 35:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या सगळ्या शत्रूंना शरम वाटावी, ते गोंधळून जावेत अशी माझी इच्छा आहे. माझ्या बाबतीत वाईट गोष्टी घडल्या तेव्हा ते लोक आनंदी होते ते माझ्यापेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटत होते. म्हणून ते लोक अपमानाने आणि लाजेने झाकोळून जावोत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या अहितामुळे आनंद करणारे सर्व एकदम लज्जित व फजीत होवोत; माझ्यापुढे तोरा मिरवणारे लज्जा व फजिती ह्यांनी व्याप्त होवोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझी संकटे पाहून आनंद करणार्यांना लज्जित आणि निराश करा; जे माझ्यापुढे प्रौढी मिरवितात, त्यांना लज्जित आणि अपमानित करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे माझ्या वाईटावर उठले आहेत, ते सगळे लज्जीत होवो आणि गोंधळून जावो. जे माझी थट्टा करतात ते लज्जेत आणि अप्रतिष्ठेत झाकले जावो.